loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारी गाडी, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान कडून लांजा पोलिसांच्या ताब्यात

केळंबे, लांजा (सिराज नेवरेकर) - बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान लांजाच्या कार्यकर्त्यांनी पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली. ही घटना रिंगणे कोंड या ठिकाणी शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता घडली असुन या घटनेत वापरण्यात आलेली गाडी व गुरे असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर या प्रकरणी राजापूर तालुक्यातील दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेळ ते पाचल रोडवर बेकायदा व विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. याबाबतची फिर्याद वेदांत विठ्ठल दळवी (वय २४ राहणार आरगाव फौजदारवाडी) यांनी दिली आहे. विनापरवाना गुरांची वाहतूक केल्या प्रकरणी लांजा पोलीसांनी नाझीम हुसेन फकीर (वय ३५, राहणार मूर मुस्लिम वाडी, तालुका राजापूर) आणि आजीम हुसेन फकीर (वय ४२ राहणार मूर मुस्लिम वाडी, राजापूर) या दोघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११, (घ), (ड), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, मोटार वाहन कायदा क.् ६६/१९२, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts