loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणंद-खेड येथे माजी सैनिक मेळावा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) : आजी माजी सैनिक कल्याण समिती व रत्नागिरी जिल्हास्तरीय रत्न सैनिक संघटनेमार्फत माजी सैनिक मेळावा ग्राम देवालय प्रांगण, धामणंद ता. खेड येथे संपन्न झाला. या मेळाव्यात अपरांत हॉस्पिटल चिपळूण तर्फे सुमारे ७२ माजी सैनिक व कुटुंबियांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नॅब आय केअर सेंटर, चिपळूण यांनी मोफत नेत्र तपासणी केली. ६७ माजी सैनिक व कुटुंबीयांनी याचा लाभ घेतला तसेच त्यावेळी आधार कार्ड दुरुस्ती व अपडेशनचे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे OIC ECHS चिपळूणचे मा. कर्नल प्रकाश चव्हाण यांचे उपस्थितीत दीपप्रज्वलन, छत्रपती शिवरायांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. दिवंगताना व शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुधीर भोसले यांनी संघटनेचे ध्येय-धोरण बाबत उपस्थितांना संबोधित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत, जिल्हा संघटक गवळी, मा. सुनिल कदम यांनी विविध कल्याणकारी योजना, माजी सैनिकांची नोंदणी, ओळखपत्र, पेन्शन, स्पर्श, नोंमिनेशन आदी विषयावर माहिती दिली. अपरांतकडून डॉ.अब्बास जबले उपस्थिततांना मार्गदर्शन केले. ऑरनरी कॅप्टन दीपक पवार सहव्यवस्थापक सीएसडी चिपळूण यांनी कँटीनबाबत विवेचन केले तसेच प्रमुख पाहुणे कर्नल प्रकाश चव्हाण यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वीपणे संपन्न व्हावा यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना संघटने मार्फत सन्मान चिन्ह प्रदान करून सन्मानित केले. जिल्हा कार्यकारिणीमार्फत आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने मेळ्याव्याची सांगता झाली. या मेळाव्याच्या आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष प्रफुल्ल रेडीज, सचिव गणेश अर्जुन सुर्वे, खजिनदार विलास गमरे, रत्नसैनिक चंद्रकांत पवार(तालुकाध्यक्ष चिपळूण), वैभव पालांडे, अनंतराव भोसले, मनोज पालांडे, उमेश पालांडे, आत्माराम कदम, उमेश महाडीक, संतोष कदम, तुषार हरवडे व सर्व माजी सैनिकांचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts