loader
Breaking News
Breaking News
Foto

मोबाईल टॉवरच्या फाउंडेशनचे काम करणार्‍या कामगाराचादुर्दैवी मृत्यू

लांजा(वार्ताहर) - मोबाईल टॉवरच्या फाउंडेशनचे काम करणार्‍या कामगाराचा मेंदूतील रक्तस्त्रावामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निवसर येथे रविवारी 13 जानेवारी रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास घडली. याबाबतची खबर ठेकेदार उत्तरेश्वर रामभाऊ घोलप (34 वर्षे, रा. पालपण, जि. बीड, सध्या रा. निवसर, ता. लांजा) यांनी पोलिसांत दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर घोलप हे मोबाईल टॉवर फाउंडेशन तयार करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे बालाजी तात्याराव सूर्यवंशी (47 वर्षे रा. गायत्री नगर जि. लातूर, सध्या रा. निवसर, ता. लांजा) हा व अन्य कामगार कामाला आहेत. सध्या उत्तरेश्वर घोलप यांचे निवसर या ठिकाणी मोबाईल टॉवर फाउंडेशन करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी 12 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सर्व कामगारांनी जेवण्यासाठी बाहेर जाण्याचे ठरवले होते. परंतु बालाजी सूर्यवंशी याने बाहेर जेवणासाठी जायला नकार दिला व तो साईडवरच थांबला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास इतर सर्व कामगार हे बाहेरून जेवण करून निवसर येथील साईडवर आले असता त्यांनी बालाजी सूर्यवंशी यास राहण्याच्या खोलीत झोपण्यासाठी चला असे सांगितले व ते सर्वजण आपल्या खोलीत निघून गेले. मात्र बालाजी सूर्यवंशी हा झोपण्यासाठी खोलीत आला नाही म्हणून इतर कामगारांनी बाहेर जावून पाहिले असता तर सूर्यवंशी हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती मालक उत्तरेश्वर घोलप यांना दिली. त्यानंतर बालाजी सूर्यवंशी याला जवळच असलेल्या चांदेराई येथील शासकीय दवाखान्यात प्रथम नेण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार बालाजी सूर्यवंशी याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून 13 जानेवारी रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास मयत घोषित केले. दरम्यान, शवविच्छेदनामध्ये बालाजी सूर्यवंशी याचा मेंदूतील रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड. कॉन्स्टे. नासीर नावळेकर हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts