loader
Breaking News
Breaking News
Foto

चिवला बीच येथे दोन कासव मृतावस्थेत

मालवण(प्रतिनिधी)- मालवण चिवला बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीची दोन समुद्री कासव मृतावस्थेत आढळून आली. याबाबत स्थानिक नागरिक कैतान सोज यांनी मालवणमधील वन्यजीव प्रेमी व कोकण वाइल्ड रेस्क्यूअरच्या सल्लागार सौं. शिल्पा यतीन खोत यांना माहिती दिली असता सौ. खोत यांनी वन, कांदळवन आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण केल्यावर संबंधित अधिकार्‍यांनी चिवला बीच येथे दाखल होत मृत कासवांची पाहणी करून ताब्यात घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अलीकडच्या काळात समुद्रात वाढलेल्या प्रदूषणामुळे समुद्रातील तुटलेल्या जाळ्यात कासव अडकल्याच्या घटना घडतात. किंवा प्लास्टिकमुळे कासवांचा मृत्यू ओढवतो. मात्र चिवला बीच येथे आढळलेल्या मृत कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचे कारण समजू शकले नाही. यावेळी देवली येथील कांदळवन वनसंरक्षक नम्रता कोळी, मालवणचे उपजीविका तज्ज्ञ केदार पालव, पशुधन पर्यवेक्षक श्री. लांडगे, मालवण वनपाल सदानंद परब, कांदळगावचे वनरक्षक लक्ष्मण आमले आदी अधिकार्‍यांनी चिवला बीच येथे दाखल होऊन या मृत कासवांची पाहणी केली. या कासवांच्या मृत्यूबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून पुढील तपास करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts