loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत; सिंधुदुर्गात ना. नितेश राणे तर रायगडमध्ये ना. आदिती तटकरे

मुंबई: राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांना देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. आदिती तटकरे यांची वर्णी लागलीे आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचे नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु त्यांना मोठा विरोध होत होता. यामुळे आता अजित पवार बीडचे पालकत्व सांभाळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच दोन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.

टाईम्स स्पेशल

दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts