loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील सलून व्यवसायिकाच्या खून प्रकरणी बियर शॉपीत चौकशी

दापोली(वार्ताहर): तालुक्यातील गिम्हवणे येथील सलून व्यवसायिकाच्या खून प्रकरणी दापोली पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली असून शनिवारी त्या त्रिकूटाने जिथून बियर आणि दारू घेतली त्या बियर शॉपीमध्ये जाऊन चौकशी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहराजवळील हाकेच्या अंतरावर असणारे गिम्हवणे उगवतवाडी येथील सलून व्यवसायिक निलेश दत्ताराम बाक्कर याचा सोमवार दि. 13 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हर्णे बायपास रोडवर त्याची पत्नी नेहा बाक्कर व तिचा कथित प्रियकर मंगेश चिंचघरकर (रा. पालगड) यांनी संगनमताने निलेश याला दारू पाजुन त्याचा खून केला होता. या खुनाचा प्लॅन काही दिवस अगोदरच ठरला असल्याचे पोलीस तपासच पुढे येत आहे. त्यातच हा खुन अगदी शांत डोक्याने करून त्या दोघांनी या खुनाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला होता.

टाईम्स स्पेशल

खून केल्यानंतर त्यांचे पुढील प्लॅनिंग त्या दोघांच्यात आधीच शिजले होते. त्यासाठी नेहाने दि. 14 जानेवारी रोजी निलेश बेपत्ता असल्याचा बनाव करीत दापोली पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र नेहाचा हा बनाव दापोली पोलिसांनी हाणून पाडत संशयाची सुई तिच्याबरोबर धरत अखेर खुनाला वाचा फोडली. ते तिघे हर्णे बायपास रोडवर जाण्याअगोदर त्यांनी एका बिअर शॉपी मधून दारू विकत घेतल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची चौकशी करण्यासाठी संशयित आरोपी मंगेश याला घेऊन दापोली पोलीस पथक शनिवारी हर्णे येथील त्या बियर शॉपीमध्ये धडकले. त्यांनी या घटनेची चौकशीही केली. दापोलीत अनेक ठिकाणी लायसन्सधारक बिअर शॉप मध्ये देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची गेली अनेक दिवस चर्चा होती. या घटनेने या चर्चेला बळ मिळाले आहे. दरम्यान संबंधित खाते आता या बियर शॉपी धारकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts