loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल मराठा महासंमेलनाचा शानदार शुभारंभ, दिग्गज शिलेदारांची फौज

रत्नागिरीत ‘अखिल मराठा महासंमेलना’चा आज शनि. दि. 18 जाने. रोजी शानदार शुभारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, अणुशास्त्रज्ञ व नामवंत डेव्हलपर डॉ. सुरेशराव हावरे, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री. अजितराव निंबाळकर, कर्नाटकचे माजी मुख्य सचिव श्री. अरविंद जाधव, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. इंद्रजीत सावंत, इंजिनिअरींग तज्ञ श्री. उमेश भुजबळराव, खा. नारायण राणे, उद्योजक श्री. संतोष घाग, श्री. सुरेश कदम, रत्नागिरी जि. प. मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ.तानाजीराव चोरगे, नामवंत विधीज्ञ अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांचेसह अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मराठा महासंमेलनात राज्यातील 57 मराठा मंडळे सहभागी झाली असून ‘अखिल मराठा फेडरेशन‘चे अध्यक्षपद रत्नागिरीतील श्री. सुरेशराव सुर्वे हे भूषवित आहेत. रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा मंडळाचे संयुक्त विद्यमाने या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनि. दि. 18 व रवि. दि. 19 जाने. असे सलग 2 दिवस मराठा मैदान, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts