loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. छोटू देसाई क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा आज रौप्य महोत्सवी वर्धापनदिन

रत्नागिरीतील सुप्रसिध्द ‘कै. छोटू देसाई क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ या क्रिकेट अकॅडमीला 25 वर्षे पूर्ण झाली असून यावर्षी ही क्रिकेट अ‍ॅकॅडमी रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने उद्या रवि. दि. 19 जाने. 2025 रोजी सायंकाळी ठिक 4.30 वा. छ. शिवाजी स्टेडियम पॅव्हेलियममध्ये रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला रत्नागिरीचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषामंत्री ना. उदय सामंत व लांजा, राजापूरचे आ.श्री. किरण सामंत तसेच श्री. मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व दै. ‘रत्नागिरी टाइम्स’च्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर असे मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती श्री. दिपक देसाई यांनी दिली. यावेळी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पातळीवर उत्कृष्ट खेळ केलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उदयन्मुख खेळाडूंना क्रिकेट किटस व बॅटस प्रदान करण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

तरी या कार्यक्रमाला सर्व क्रिकेटप्रेमींनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन ‘कै. छोटू देसाई क्रिकेट अ‍ॅकॅडमी’चे अध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ पाथरे, कार्याध्यक्ष श्री.रमेश कसबेकर, सचिव श्री. दिपक देसाई व खजिनदार श्री. मृत्यूंजय तथा लाल्या खातू यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts