loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मराठा महासंमेलन, दिग्गज शिलेदारांची फौज

रत्नागिरी - रत्नागिरीत अखिल मराठा महासंमेलनाचा आज शनि. दि. १८ जाने. रोजी मोठ्या थाटामाटात शुभारंभ झाला. या महासंमेलनासाठी सार्‍या महाराष्ट्रातून दिग्गज शिलेदारांची जणू ‘फौज’ रत्नागिरीत दाखल झाली आहे. या महासंमेलनाला मराठा बंधू भगिनींची फार मोठी गर्दी लोटली होती, सभागृह खचाखच भरले होते. मराठा बांधव विलक्षण जोशात आणि उत्साहात होते, महासंमेलन यशस्वी करायचे या निर्धाराने ते जणू मैदानात उतरले होते.. सारे वातावरण भारलेले होते. या संमेलनासाठी राज्यातील सुमारे ५७ मराठा मंडळांचे पदाधिकारी सकाळपासूनच रत्नागिरीत येऊन दाखल झाले. हे अखिल मराठा महासंमेलन मराठा मैदान, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील विविध मराठा मंडळांचे ‘अखिल मराठा फेडरेशन’ स्थापन करण्यात आले असून त्याचे अध्यक्षस्थान रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे भुषवित आहेत. रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा मंडळ या दोन्हीही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळपासूनच रत्नागिरीतील मराठा मैदानावर मराठा बंधू भगिनींची गर्दी जमू लागली होती. या महासंमेलनाचा शुभारंभ छ. शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुरेशराव सुर्वे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले, ‘‘ही सुरुवात आहे, मराठे समाजासाठी आता एकत्र आले आहेत आणि येत्या काळात मराठा समाजातील तरुणांनी नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे’’ असे त्यांनी आवाहन केले. या महासंमेलनासाठी ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, अणुशास्त्रज्ञ व डेव्हलपर डॉ. सुरेशराव हावरे, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अजितराव निंबाळकर, कर्नाटकचे माजी मुख्य सचिव अरविंद जाधव, सुप्रसिध्द इतिहासकार डॉ. इंद्रजीत सावंत, इंजिनिअरींग तज्ज्ञ उमेश भुजबळराव, खा. नारायण राणे, दिलीप जगताप, संतोष घाग, सुरेश कदम, डॉ. तानाजीराव चोरगे, ऍड. सतीश मानेशिंदे असे दिग्गज व कर्तबगार अतिथी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या महासंमेलनाचे प्रसंगी सुरेशराव सुर्वे, सुप्रसिध्द डेव्हलपर व अणुशास्त्रज्ञ सुरेशराव हावरे, अरुण पवार, सुप्रसिध्द इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, उमेश भुजबळराव, खा. नारायण राणे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी कर्तबगार मराठा बांधवांचा विविध मानाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी गाजवलेले मराठा बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी अखिल मराठा फेडरेशनच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी महासंमेलना निमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले. मराठा मैदानावर स्व. ऍड. शशिकांतराव तथा अप्पासाहेब पवार नगरीत अखिल मराठा फेडरेशनतर्फे हे ‘अखिल मराठा महासंमेलन’ अत्यंत दिमाखदार व झोकात आज सुरु झाले. उद्घाटन समारंभाला मोठी गर्दी उसळली होती. सभागृह खचाखच भरुन गेले होते आणि सभागृहाबाहेर मराठा बंधू भगिनी मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रम पाहत होते. या महासंमेलनासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सभागृहाबाहेर असलेल्या बांधवांना देखील स्टेजवरील सोहळा पाहता येत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रत्नागिरीतील अखिल मराठा संमेलनाला अलोट गर्दी उत्तुंग कर्तबगारांचा विविध पुरस्कारांनी गौरव संपन्न!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts