loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मराठा महासंमेलन, दिग्गज शिलेदारांची फौज

रत्नागिरीत सुरु असलेल्या मराठा महासंमेलनाचा आजचा दुसरा दिवस मात्र काल विविध कार्यक्रमांनी संमेलनाला चांगला हुरुप आला. दैदिप्यमान असे संमेलन पहावयास मिळाले. अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल मराठा फेडरेशन व मराठा बिझनेसमेन फोरमचे संस्थापक स्व. ऍड. शशिकांत तथा अप्पासाहेब पवार यांना व कोकणचे सुपूत्र स्व. केशवराव भोसले यांना मरणोत्तर ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. या दोघांचेही कुटुंबिय हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. स्व. अप्पासाहेब पवार यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे दोघे कर्तबगार चिरंजीव श्री. योगेश पवार व श्री. विरेंद्र पवार आले होते तर स्व. केशवराव भोसलेंचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या पत्नी, कन्या व जावई आले होते. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व खा. नारायण राणे यांना ‘दि ग्रेट मराठा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. खा. नारायण राणे यांनी उपस्थित राहून तो स्वीकारला. तसेच ज्येष्ठ इतिहासकार डॉ. श्री. जयसिंगराव पवार यांना यावेळी ‘अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार’ समारंभपूर्वक प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला. बुजूर्ग इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचा मराठा महासंमेलनात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याबद्दल अनेकांनी संतोष व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ व डेव्हलपर डॉ. सुरेशराव हावरे, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व ‘सारथी’चे अध्यक्ष श्री. अजितराव निंबाळकर, कर्नाटकचे माजी मुख्य सचिव श्री. अरविंद जाधव, सुप्रसिध्द इतिहासकार डॉ. श्री. इंद्रजित सावंत या मान्यवरांचा ‘अखिल मराठा समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच ऍडव्हान्स इंजिनिअरींग मधील तज्ज्ञ श्री. उमेश भुजबळराव यांना ‘अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री श्री. रविंद्र माने, माजी आ. बाळासाहेब माने, श्री. उदय बने, माजी जि. प. अध्यक्ष श्री. राजेंद्र महाडिक व श्री. रोहन बने, आर्किटेक्ट श्री. संतोष तावडे, श्री. प्रताप सावंत देसाई, श्री. राजेश सावंत, सुप्रसिध्द उद्योजक श्री. दिपकशेठ साळवी व दै. ‘रत्नागिरी टाइमस’च्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यासाठी रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा मंडळच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले. रत्नागिरीत अखिल मराठा महासंमेलन आयोजित करण्याचे स्व. ऍड. शशिकांत तथा अप्पासाहेब पवार यांचे स्वप्न होते व सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुन त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेले. यावेळी श्री. सुनिलदत्त देसाई, श्री. केशवराव इंदुलकर, सौ. अंजली इंदुलकर, श्री. कमलाकर तथा भाऊ देसाई, प्रा. प्रताप सावंत देसाई, ज्येष्ठ उद्योजक श्री. रविंद्र घोसाळकर, श्री. संतोष तावडे, श्री. राकेश नलावडे, श्री. उपेंद्र सुर्वे, प्रा. चंद्रमोहन देसाई, श्रीमती प्राची शिंदे, श्री. जितेंद्र विचारे, श्री. योगेश साळवी, श्री. प्रदीप साळवी, श्री. प्रमोद निकम, श्री. कौस्तुभ सावंत, सौ. श्रेया इंदुलकर, श्रीमती संध्या मोरे, पत्रकार श्री. किशोर मोरे, तरुण उद्योजक श्री. विराज घोसाळकर, श्री. योगेश पवार, श्री. विरेंद्र पवार, दै. ‘रत्नागिरी टाइम्स’च्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रत्नागिरीतील अखिल मराठा संमेलनाला अलोट गर्दी उत्तुंग कर्तबगारांचा विविध पुरस्कारांनी गौरव संपन्न!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts