loader
Breaking News
Breaking News
Foto

महाकुंभ मेळ्यात भीषण आग ,

प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरच्या स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts