loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात आंबा मोहोर संरक्षण कार्यक्रमातुन मार्गदर्शन

मालवण(प्रतिनिधी)- मालवण वायरी येथे श्री. अनिकेत अनिल फाटक यांच्या आंबा प्रक्षेत्रावर महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबा मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषि अधिकारी मालवण श्री. एस.जी. परब यांनी उपस्थितांचे स्वागत करून आंबा मोहोर व त्यावरील मुख्य म्हणजे फुलकीडीचा तसेच तुडतुडे यांचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून झाल्यास त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर होतो त्यासाठी आंबा मोहोर संरक्षण व योग्यरित्या व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रादेशिक फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर, कृषि पर्यवेक्षक मालवण श्री. डि. डि.गावडे, वायरी गावचे सरपंच श्री. भगवान लुडबे, ग्रामपंचायत सदस्य, कृषिसेवक मालवण श्री. के. एस. कदम तसेच वायरी - मालवण येथील प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी श्री. सुभाष पाटकर, जयवंत लुडबे, रामचंद्र लुडबे, गणेश लुडबे, इ. उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts