loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख बाजारपेठेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

देवळे (प्रकाश चाळके) : देवरुख बाजारपेठेतील एसटी स्टँडजवळील वर्दळीच्या ठिकाणी उभा असलेला विजेचा एक धोकादायक पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, चालू वीजपुरवठ्यासह तो बाजारपेठेत पडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. या गंभीर स्थितीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतून हजारो लोक दररोज विविध कामांसाठी येत असतात. एसटी स्टँडजवळील हा पोल कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडवू शकतो. जर वर्दळीच्या वेळी हा पोल कोसळला, तर संभाव्य जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान याची कल्पना सुद्धा भयंकर आहे. बाजारातील व्यापारी आणि नागरिकांना या परिस्थितीमुळे सतत भीतीचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यापार्‍यांनी याप्रकरणी सह्यांची मोहीम राबवून महावितरणकडे निवेदन सादर केले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकार्‍यांनी याकडे केवळ कागद खालच्या ऑफिस मधून वरच्या ऑफिस मध्ये जमा करायला सांगून कागदावर चर्चा करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. या अनास्थेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या पोलवर कोणत्याही उपाययोजना न केल्यास दुर्घटना घडल्यावर जबाबदारी कोण घेणार? खालचे ऑफिस की वरचे ऑफिस? हे महावितरणने स्पष्ट करावे, अशी मागणी क्रांती व्यापारी संघटनेने केली आहे. अशा स्थितीत अधिकार्‍यांची निष्क्रियता लोकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. महावितरणने त्वरित हा धोकादायक पोल बदलावा, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांती व्यापारी संघटनेने दिला आहे. लोकांच्या जीविताहून महत्त्वाचे काहीही नाही. काही काळ वीजपुरवठा खंडित झाला तरी चालेल, पण हा जीवघेणा धोका दूर करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक आणि व्यापार्‍यांनी दिली आहे. महावितरणने या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष द्यावे आणि वेळेत कारवाई करून जनतेच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts