loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे येथे रंगला मल्लखांब आणि लाठी काठी प्रात्यक्षिकाचा थरार

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग यांच्या माध्यमातून भारतमातेच्या भूमिपुत्रांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने ऐतिहासिक साहसी खेळांना पुनरुज्जीवन मिळावे यासाठी मल्लखांब ग्रुप हुंबरणे यांची मल्लखांब प्रात्यक्षिके तर एसएसआय १+ ग्रुप बीडवाडी कणकवली यांनी लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी चिमुकल्यांचे सादरीकरण उपस्थितांना थक्क करून सोडणारे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आयडीएल स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, ईशस्तवन आणि देशभक्तीपर गीते सादर केली. कु. सर्वज्ञ वराडकर आणि कु. आदेश खानोलकर यांच्या एकपात्री अभिनयाने इतिहास काळात डोकावल्यासारखे वाटले. या प्रसंगी प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत बाबल अल्मेडा रेस्क्यु टिम, वनश्री फाऊंडेशन, नवीद हेरेकर, नाट्य कलाकार कृष्णा देसाई आणि दोडामार्ग पोलिस ठाणे पीआय निसर्ग ओतारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नूतन विद्यालय कळणेचे सहायक शिक्षक उमेश देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर निसर्ग ओतारी यांनी सह्याद्री प्रतिष्ठान च्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशासक सिद्धू परब यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts