loader
Breaking News
Breaking News
Foto

खंडाळा-चाफेरीच्या मैदानावर एस.पी.एल.चा क्रिकेट धमाका

खंडाळा (प्रतिनिधी) : मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्यावतीने सरकार प्रेमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा तीन दिवस मोठ्या उत्साहात पार पडल्या. मंडळाचे अध्यक्ष आशु दादा भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. एसपीएलसाठी आठ संघ मालकांनी भाग घेतला होता. एस पी एल मध्ये स्थानिक सह रत्नागिरी रायगड मुंबईमधील खेळाडू या सामन्यांमध्ये खेळत होते. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्या वतीने सरकार प्रीमियर लीग भव्य क्रिकेटमध्ये सुंदर असे तीन दिवस नियोजन बघण्यास मिळाले. याचे सर्व श्रेय आशुदादा भालेकर यांच्या टिमला जाते. खंडाळ्याचे तरुण उद्योजक दुर्वास पाटील, जांभरीचे सरपंच आदेश पावरी, वरवडेचे प्रशांत विचारे व महेश भालेकर यांचे विशेष योगदान लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एस.पी.एल.मध्ये फायनल सामना कै. रामदास भाई बलेकर विरुद्ध खंडाळा यांच्यात झाला. या सामन्यात खंडाळा संघाने विजय संपादन केला. बक्षीस वितरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती शरद दादा चव्हाण, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, वाटदचे सरपंच अमित वाडकर, संजय सीतप, अंकलगे गुरुजी, दीपक वाईकर, ललित भाई, संदेश सावंत रत्नागिरी, परेश माने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. एस.पी.एल. क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आशिष भालेकर, महेश भालेकर, दीपक चौगुले, संदीप कश्यप, अजय गोरे, किरण बेकर, भाई पेडणेकर, अजय अवेरे, अमोल पवार, मुकेश पवार, तुषार पोमेंडकर, मुकुंद वीर, किरण पागडे, जीत पागडे, भरत गोरे यांचे विशेष प्रयत्न होते तर निखिल चव्हाण यांचे पण सहकार्य लाभले तसेच संस्कार बैकर, राज अमेय भडसावले, प्रभाकर थोपटकर, मुकुंद वीर, कल्पेश महाकाळ, विशाल घवाळी, निनाद सहस्त्रबुदे तसेच मैदानावरील पंच व आशु दादा भालेकर यांचे मित्रमंडळींचे खूप सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts