loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदे-वावळीवाडी येथे एस.टी.च्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी!

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील गुणदे वावळीवाडी येथील थांब्याच्या पुढील स्पीडब्रेकरजवळ एस.टी.च्या धडकेने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. संतोष बाबू आंब्रे (वय-४८ वर्षे, रा. गुणदे-तांबडवाडी, ता. खेड ) असे जखमी मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. या अपघाताची फिर्याद येथील पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस नाईक संतोषी सुनील पडळकर यांनी दिल्यानंतर पोलीसांनी दि. २१ जानेवारी २०२५ रोजी आरोपी हनुमंत विक्रम भाबड (वय - ३९ वर्षे, रा. खेड एस. टी. डेपो, ता. खेड, मुळगांव - मु.पो. कोरेगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा रजि.नं. १६/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) मोटारसायकल वाहन कायदा कलम- १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमी संतोष बाबू आंब्रे हे गुणदे तांबडवाडी येथील घरुन त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम. एच. ०८ ए. एफ. ९१७५ वरुन जात असताना समोरुन येणारी एस.टी. बस क्र. एम. एच. ४० एन-९७२३ वरील आरोपी चालक हनुमंत भाबड याने गुणदे वावळीवाडी येथील स्टॉपच्या पुढील स्पीड ब्रेकरजवळ बस सावकाश न घेता रस्ता अरुंद असल्याचे माहित असताना भरधाव वेगाने बस चालवून समोरुन आपल्या साईडने आलेल्या मोटारसायकल चालक संतोष बाबू आंब्रे यांच्या ताब्यातील मोटारसायकलला समोरून धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये मोटारसायकल चालक यांच्या ओठाला व मानेच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मानेच्या मणक्याच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मानेच्या मणक्याची चपटी दबल्याने त्यांच्या कमरेपासून खालील भाग कोणतीही हालचाल करीत नाही. तसेच मोटारसायकलच्या समोरील शोचे तसेच हेडलाईट व समोरील मडगाईचे व एस. टी.च्या समोरील सेफ्टीगार्ड ड्रायव्हर बाजूकडील आतमध्ये दबून नुकसानीस कारणीभूत झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts