loader
Breaking News
Breaking News
Foto

कांदळगावच्या रामेश्वर वाचनालयात ’वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम संपन्न

मालवण(प्रतिनिधी)- मुलांची व नागरिकांची वाचन संस्कृती टिकून राहवी व वृद्धिंगत व्हावी, या हेतूने सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये ’वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम साजरा करण्यात यावा, या शासनाच्या सूचनेनुसार श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ग्रंथालयात वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नं. १ एकचे विद्यार्थी व माध्यमिक गटामध्ये ओझर विद्या मंदिर, कांदळगावचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना पारितोषिके दिली. उर्वरितांना शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह प्रवीण पारकर, खजिनदार गजानन सुर्वे, सदस्य मंगेश कदम, आर. पी. बागवे मुख्याध्यापिका अर्चना उमेश कोदे, शाळा कांदळगाव नं. १ च्या मुख्याध्यापिका संध्या मेतर, ग्रंथपाल साक्षी मेस्त्री, महेश साळकर, रेश्मा मंगेश कदम उपस्थित होते. वाचन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - गट क्रमांक १-पहिली ते तिसरी- प्रथम- हृदया नारायण मिस्त्री, द्वितीय-सात्विक विद्याधर राणे, तृतीय-मनस्वी रोहन राणे. गट क्रमांक २ - चौथी ते पाचवी - प्रथम ईश्वरी महेश परब, द्वितीय रुई रामचंद्र गुरव, तृतीय गंबाजी दिगंबर परब. माध्यमिक गट- सहावी ते दहावी प्रथम संचिता संदेश परब, द्वितीय अमृता गणेश बागवे, तृतीय श्रमिक जीवन कांदळगावकर, उत्तेजनार्थ रिद्धी कदम.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts