loader
Breaking News
Breaking News
Foto

बांग्लादेशींना ताबडतोब बाहेर काढा', शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बई मध्ये वांद्रे परिसरात अभिनेता सैफ अली खान वर त्याच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्यातील आरोपी बांग्लादेशी असल्याचं समोर आल्यानंतर भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांग्लादेशींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई शहराला सुरक्षित करण्यासाठी मुंबई आणि एमएमआर भागात राहत असलेल्या बेकायदेशीर बांग्लादेशींना तातडीने पुन्हा त्यांच्या देशात पाठवावे अशी मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना खासदार देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचं पत्र लिहलं आहे. यामध्ये भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आणि सहाजिकच बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्यानंतर अनेकांना मुंबई आणि एमएमआरचा भाग भुरळ घालतो. त्यामुळे हाऊसकिपिंग च्या कामं पाहणार्‍या संस्थांचं नियमित ऑडीट होणं गरजेचे आहे. या कंपन्यांनी लोकांना नोकरीवर ठेवताना त्यांच्या ओळखपत्राची नीट पाहणी करणं आवश्यक आहे. त्यांच्या नागरिकत्त्वाचा पुरावा पाहणं आवश्यक आहे. दरम्यान सैफ अली खान वर बेतलेला प्रसंग कोणत्याही सेलिब्रीटी प्रमाणे सामान्य नागरिकांवरही येऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी ANI कडे बोलताना दिली .

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेला आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा बेकायदेशीरपणे भारतात घुसलेला बांग्लादेशी होता.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts