loader
Breaking News
Breaking News
Foto

जय गणेश मंदिर मेढा येथे माघी जयंती उत्सव

मालवण(प्रतिनिधी)- जय गणेश मंदिर मेढा मालवण येथे माघी जयंती उत्सव २० वा वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दिलीप ठाकुर व सहकारी नांदी सादर करणार आहेत. रात्री ८.१५ वाजता श्री भूतनाथ भजन मंडळ वायरी भूतनाथ मालवण (बुवा-भालचंद्र केळुसकर) यांचे सुश्राव्य भजन. ३१ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीकृष्ण महिला भजन मंडळाचे भजन होणार आहे. रात्री ८.१५ वाजता वायंगणी आचरा येथील बुवा-सचिन रेडकर यांचे भजन. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेश जन्मदिनानिमित्त पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे यांचे कीर्तन व श्री गणेश जन्म, रात्री ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी या विविध कार्यक्रमांचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts