loader
Breaking News
Breaking News
Foto

माळगाव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. संजय खोत तर उपाध्यक्षपदी अरुण भोगले.

मालवण(प्रतिनिधी)- मालवण तालुक्यातील माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संजय पुंडलिक खोत तर उपाध्यक्षपदी अरुण शांताराम भोगले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीची त्रैवार्षिक सभा न्यू इंग्लिश स्कूल माळगावच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष डॉ. संजय खोत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सन २०२५ ते २०२८ पर्यंत या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माळगाव हायस्कूलसाठी मागील कित्येक वर्षे मोलाचे योगदान देणारे बागायत येथील सेवाभावी डॉ. संजय खोत यांचीच अध्यक्षपदी फेर निवड करण्याची बैठकीमध्ये ठरविण्यात आले यावेळी संस्थेची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे :- अध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्षपदी अरुण भोगले, सेक्रेटरी (सचिव) हेमंत हडकर, खजिनदार महादेव सुर्वे, संचालक मंडळ शशिकांत सरनाई, सुधीर पडेलकर, गोविंद भोगले, कृष्णा वंजारे, गौतम तांबे, तर सल्लागार म्हणून तातू भोगले, चंद्रकांत राणे, प्रमोद कासले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी माळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय जोशी सहाय्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य तथा नूतन संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले म्हणाले की मागील कित्येक वर्षे माळगाव हायस्कूलची प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे यासाठी मागील संचालक मंडळाने माळगाव हायस्कूलच्या प्रगतीसाठी वेळोवेळी हायस्कूलच्या हिताचे निर्णय घेऊन माळगाव हायस्कूल मालवण तालुक्यात आदर्शवत असे बनविले आहे. अध्यक्ष डॉक्टर संजय खोत सर्व संचालक मंडळ, सल्लागार, पालक, ग्रामस्थ, सभासद यांच्या विचाराने व सहकार्याने पुढील तीन वर्षात प्रशालेसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू असे आश्वासन नूतन उपाध्यक्ष अरुण भोगले यांनी दिले. यावेळी वेरळ माळगाव आवळदेवाडी भोगलेवाडी खेरवंदवाडी वडाचापाट मधील सभासद ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व सभासदांनी नूतन कार्यकारणीला भावी कार्यकाळासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts