loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशीत वन विभागाकडून माकडे पकडण्यासाठी मोठी मोहीम यशस्वी - सुमारे 96 माकडे पकडली

दापोली :- तालुक्यातील केळशी परिसरात माकडाने केळशी रहिवाशी, व्यापारीवर्ग, भाजीविक्रेते, वडापाव दुकानदार, शेतकरी वर्ग, बागायतदार यांना त्रस्त करून सोडले होते. या परिसरात केळशी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार दापोलीचे वन विभाग श्री. पाटील तसेच शुभांगी गुरव व त्यांचे सहकारी श्री. सुरज जगताप आदींनी दि. 20 ते 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी असे दोन दिवस या उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. यावेळी सुमारे 96 माकडे पिंजऱ्यात पकडण्यात आली असल्याचे समजते. या माकडांना केळी शेंगदाणे, चपाती आदींचे आमिष दाखवून पिंजऱ्याकडे आकर्षित करण्यात आले. ही माकडे थोड्या थोड्या वेळाने या पिंजरातील खाद्य खाण्यासाठी येत होती. माकडे पिंजऱ्यात शिरल्यानंतर लगेचच त्या पिंजऱ्याचे दरवाजे बंद करण्यात येत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उर्वरित माकडे देखील अशीच पकडून न्यावीत असे केळशी गाववासीय विनवणी करत आहेत. वन अधिकारी यांना मदतीचा हात केळशीचे माजी सरपंच श्री. केदार पतंगे, श्री. नरेंद्र आग्रे, उटंबर पोलीसपाटील श्री. श्रीकांत साबळे, श्री. बळीराम उके आदी ग्रामस्थ सहभागी झाल्याने वनअधिकारी वर्गाला मोठी मदत झाली. वनअधिकारी वर्गाने ही त्रासदायक माकडे पकडून नेल्याने येथील जनतेने वनधिकारी वर्गाला धन्यवाद दिले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts