loader
Breaking News
Breaking News
Foto

नितीश कुमार यांचा अचानक मोठा निर्णय,पाठिंबा काढला

जनता दल युनायटेड (जेडीयू) ने मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. जनता दल युनायटेडने मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा औपचारिकपणे काढून घेतला आहे. आता राज्य विधानसभेतील एकमेव जेडीयू आमदार विरोधी बाकावर बसतील. 2022 पासून राज्यात जेडीयूची भाजपसोबत युती होती. आता जेडीयूने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. जेडीयूने पाठिंबा काढून घेतला असला तरी बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान, भाजपचे येथे 32 उमेदवार आहेत तर जेडीयूचे 6 उमेदवार होते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

याचे राजकीय परिणाम केंद्रात उमटणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts