loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी येथे तिलारी उजव्या कालवा जलवाहिनी कोसळली, शेतकरी बांधवांवर हंगामात पाणी संकट

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभाग निगडित असलेल्या तेरवण मेढे उन्नेयी बंधारा धरणाच्या उजव्या कालव्याचा घोटगेवाडी केर नदी पात्रातून गेलेल्या जलवाहिनी पाईप तुटून बांधकाम सहित नदी पात्रात कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. एक वर्षापूर्वी या जलवाहिनी पाईपलाईन कामावर जलसंपदा विभाग यांनी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती. असे असतानाही जलवाहिनी कोसळली यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जलवाहिनी कोसळली यामुळे हंगामात घोटगेवाडी, घोटगे, परमे, गावातील केळी बागायतदार शेतकरी यांच्यावर पाणी संकट ओढवले आहे. ही दुरुस्ती करते समयी संबंधित इंजिनिअर काय करत होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तिलारी धरणाच्या एका बाजूला तेरवण मेढे उन्नेयी बंधारा लहान धरण आहे. या धरणाच्या उजव्या कालव्यातून घोटगेवाडी, भटवाडी, घोटगे, परमे, गावातील शेतकरी बांधवांना उन्हाळी शेती, केळी बागायतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. पुढे हा कालवा तिलारी धरणाच्या मुख्य उजव्या कालव्याला मिळतो पुढे हा कालवा पेडणे गोवा असा जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा कालवा विभाग यांनी केर घोटगेवाडी नदी पात्रात खांब बांधून तसेच लोखंडी पिलर्स उभे करून त्यावरून जलवाहिनी पाईप लाईन पुढे मायनर कालव्यात सोडली आहे. ही जलवाहिनी पाईप टाकताना आवश्यक ती काळजी घेतली नाही यामुळे या अगोदर दोन तीन वेळा कोसळली होती. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक होत्या पण तशा झाल्या नाहीत. घोटगेवाडी केर नदी पात्रात खांब तसेच लोखंडी पिलर्स काम योग्य पध्दतीने केले नाही. कालव्यातून पाणी जलवाहिनी पाईप लाईनमध्ये येते हा भार लक्षात घेऊन तशा उपाययोजना आवश्यक होत्या पण तशा झाल्या नाहीत. त्यामुळे एक वर्षापूर्वी या ठिकाणी जलवाहिनी पाईप लाईन तुटून नदी पात्रात पडली होती. अनेक दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री कालवा जलवाहिनी पाईप लाईन बांधकाम लोखंडी पिलर्स सह नदी पात्रात कोसळली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts