loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर मौजे असुर्डे रेल्वे रुळावर छीन्न विछीन्न अवस्थेत 34 वर्षीय युवकाचा मृतदेह

संगमेश्वर /एजाज पटेल                     संगमेश्वर मौजे असुर्डे रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी कोकण रेल्वेचा ट्रॅक मेन कर्मचारी हा धामणी ते उक्षी असा गस्त घालत असताना मौजे असुर्डे बोगद्याच्या आलीकडे रेल्वे रुळावर छीन्न-विछीन्न अवस्थेत रेल्वे रुळावर मृतदेहाच्या शरीराचे  काही अंतरा पर्यंत रेल्वे रुळावर तुकडे तुकडे  दिसून आले .याची माहिती रेल्वेचे कनिष्ठ अभियंता डी. के. जाधव यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी सकाळी धामणी -ते उक्षी रेल्वे रुळावर गस्त घालत असताना मौजे असुर्डे या ठिकाणी 176/3 रेल्वे रुळाच्या ठिकाणी एका पुरुष व्यक्तीचा रेल्वे रुळावर काही अंतरा पर्यंत छीन्न -विछीन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे -तुकडे ट्रॅकमेनला दिसून आले. मृत व्यक्ती हा 11100 मडगाव लोकमान्य ट्रमिनल रेल्वेने प्रवास होता. त्याच रेल्वे बोगीत त्याची बॅग मिळाली असून त्या बॅगेत मिळालेल्या आधारकार्ड वरून मृत व्यक्तीचे नाव गिरेन अजित राजभोंशी वय वर्ष 34 असून आसाम राज्यातील गोरेश्वर येथील असल्याचे आधारकार्ड वरून त्याची ओळख पटली असून तो रेल्वेच्या ज्या बोगीतून प्रवास करत होता त्या बोगीतून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांकडून पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार गिरेन हा मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच त्याने धावत्या रेल्वेतून उडी घेतली. दरम्यान घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत आसाम पोलिसा मार्फत पोहचवण्यात आले असून अधिक तपास संगमेश्वर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ओळख पटवण्यात संगमेश्वर पोलिसांना यश, मृत व्यक्ती आसाम जिल्ह्यातील.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts