loader
Breaking News
Breaking News
Foto

‘‘आंतर विद्यापीठ संशोधन महोत्सव आविश्कार-२०२४’’ मध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे यश

दापोली (प्रतिनिधी) - आविष्कार २०२४ या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन महोत्सवाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगांव, जि. रायगड येथे करण्यात आले होते. या महोत्सवात महाराष्ट्रातील एकूण २६ विद्यापीठांमधून ७७७ स्पर्धक विविध प्रवर्गांमध्ये सहभागी झाले होते. या विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतून विद्यापीठ स्तरावर निवड झालेले एकूण २६ प्रकल्पांचे सादरीकरण या महोत्सवामध्ये करण्यात आले. यामध्ये सुरुवातील पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आले व त्यातून निवड झलेल्या एकूण ६ प्रकल्पांचे मॉडेल प्रेझेंटेशन घेण्यात आले. त्यामधून २ प्रकल्पांची अंतिम निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये पदव्युत्तर आचार्य पदवी या प्रवर्गातून कु. तेजश्री दहिफळे हिने सादर केलेल्या crop shield sprayer या प्रकल्पाला राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यासाठी तिला डॉ.संतोष वरवडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच पदव्युत्तर पदवी या प्रवर्गातून कु. श्रध्दा वाघमारे या विद्यार्थीनीने सादर केलेल्या Nutri Muffin ' s for fasting folks या प्रकल्पाला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आविष्कार २०२४ मध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय भावे, शिक्षण संचालक डॉ.सतिश नारखेडे, संशोधन तथा संचालक, विस्तार शिक्षण डॉ.पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, संचालक, क्रीडा व सहशैक्षणीक उपक्रम डॉ. अरुण माने, विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉ. मनिष कस्तुरे आदींनी विद्यापीठातर्फे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts