loader
Breaking News
Breaking News
Foto

पूरग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई नाही; ठाकरे शिवसेनेचे खेड तहसिलदार यांना निवेदन

खेड (प्रतिनिधी) : शहरातील काही पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी सातत्याने निवेदने व साखळी उपोषणाचा मार्ग पत्करुनही अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुधीर सोनावणे यांना निवेदन देण्यात आले. तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२०२३ व २०२४ या दोन वर्षात पूरपरिस्थितीमुळे व्यापाराचे अतोनात नुकसान होते. महसूल विभागाकडून पंचनामे देखील करण्यात आले. मात्र मोजक्याच पूरग्रस्तांना नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे. अन्य नुकसानग्रस्त व्यापारी अजूनही मोबदल्यापासून वंचित आहेत. यापूर्वी साखळी उपोषणादरम्यान रक्कम देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप पूर्तताच न झाल्याने पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी शहरप्रमुख शेखर पाटणे, उपशहरप्रमुख राजन निर्मळ, विनय तोडणकर, सचिन सकपाळ, मंदार शिर्के, संगम मोडसिंग, स्वप्निल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts