loader
Breaking News
Breaking News
Foto

वाचाळविरांना लगाम? महायुती सरकार मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू करण्याच्या विचारात

मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने, त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होणे आणि मग त्यावरुन निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित पक्षाच्या शीर्ष नेत्यांना मैदानात उरावे लागणे, आदी गोष्टी टाळण्यासाठी महायुती सरकार मंत्रिमंडळ सदस्यांसाठी एक आचारसंहिता आणणार असल्याचे वृत्त आहे. काही वाचाळवीर मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादांच्या मालिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वाचळविर मंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे सरकारला नाहक विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो, तसेच, जनमानसातही खराब प्रतिमा निर्माण होते. त्यासाठीच सरकार हे पाऊल टाकत असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांना धोरणात्मक बाबींवर भाष्य न करण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. आपल्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या बैठकीत पवार यांनी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक मुद्यांवर चर्चा करावी यावर भर दिला. धोरणात्मक बाबींवर भाष्य करणे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. कृपया अशी विधाने करणे टाळा ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात किंवा सरकारची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, असे पवार म्हणाले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाच्या विमा योजनेबाबत (Crop Insurance Scheme) केलेल्या वक्तव्यानंतर आचारसंहितेची तीव्र गरज भासत असल्यावर सरकारमधील उच्चपदस्त नेत्यांचे एकमत झाले. कोकाटे यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, ज्यामुळे ती अखेर रद्द करण्यात येणार असल्याबाबत विधान केले. त्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून टीका सुरू झाली. नाना पटोले यांनी टीका करताना म्हटले की, शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देण्यात गंभीरतेचा स्पष्ट अभाव आहे. हे गैरव्यवस्थापन अस्वीकार्य आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी सर्वसमावेशक आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनावश्यक वाद टाळणे आणि सरकारची विश्वासार्हता राखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी अवास्तव टिप्पणी आणि सरकारच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी आचारसंहिता लागू करण्याची योजना आखली आहे.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts