loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबणी रुग्णालयातील गैरसोयी त्वरित दूर करा, मनसेची मागणी; प्रांताधिकार्‍यांना निवेदन

खेड (प्रतिनिधी) : करोडो रुपये खर्च करून शासनाने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत अद्ययावत केली. परंतु या ठिकाणी सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे गरजवंत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा उपोषण करावे लागेल, असा इशाराही मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना देण्यात आले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत होते; मात्र गेल्या काही महिन्यांत तिथे आवश्यक सोयीसुविधाच मिळत नाहीत. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध नाही. औषधसाठा वेळेवर होत नाही. अनेकवेळा बाहेरून मागवावी लागतात. त्यामुळे रुग्णांना आवश्यक सर्व औषधे उपलब्ध झाली पाहिजेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन धूळखात पडली आहेत. त्या त्वरित सुरू करण्यासाठी पावले उचलावीत. ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली पाहिजे. भूलतज्ज्ञ नसल्यामुळे शस्त्रक्रिया करतेवेळी अडचणी येत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांसह तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे व रुग्णालय प्रमुखांना दिले. यावेळी वैभव खेडेकर, संजय आखाडे, ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, जयेश गुहागरकर व सर्वेश पवार उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts