loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात तरूणाचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न ||

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा बस स्थानकातील प्रवाशी वर्ग आणि व्यापारी यांना होणारा धुळीचा त्रास लक्षात घेता लांजातील तरूण प्रथम प्रसन्न शेट्ये यांनी स्वखर्चाने मंगळवारी संपूर्ण बस स्टॅट परिसरात टँकरव्दारे पाणी मारून धुळीचा त्रास दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तरूण वयात असलेल्या सामाजिक बांधिलकी बाबत समाधान व्यक्त केले जात आहे. बसस्थानकाच्या कॉक्रटीकरणाचे काम मे महिन्यात पुर्ण झाले आहे. मात्र सध्या या बस स्थानकात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशी वर्गासह व्यापार्‍यांना धुळीचा खुपच त्रास होत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. धुळीमुळे हैराण झाल्याने या धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने जनतेतून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लोकांना होणारा धुळीचा त्रास लक्षात घेता प्रथम शेट्ये या तरुणाने बसस्थानकात स्वखर्चाने पाणी मारले आणि धुळीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या सामाजिक बांधिलकीच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts