loader
Breaking News
Breaking News
Foto

गिरोडा गावात शेतविहिरीत पडलेल्या जंगली गवा रेड्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका ---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- गिरोडा गावातील शेतकरी मनोहर गवस यांच्या शेतातील शेत विहिरीत भला मोठा गवारेडा पडला आहे. तो बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे. याची माहिती पोलीस पाटील यांनी दोडामार्ग वन विभाग याना देताच दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी घटनास्थळी जाऊन अखेर जेसीबी मशीन लावून विहीर एका बाजूला खोदून गवारेड्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग खुला केला या नंतर जंगलात रवाना झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल यांनी कोणत्याही परिस्थितीत गवारेडा वाचला पाहिजे यासाठी तातडीने यंत्रणा हलविली वन विभाग वनपाल संग्राम जितकर, वनरक्षक उमेश राणे, विश्राम कुबल, आज रोजी पोलिस पाटील गिरोडे यांनी दिलेल्या बातमीवरून श्री. सदाशिव मनोहर गवस रा. गिरोडे यांच्या शेत विहिरीमध्ये वन्यप्राणी गवा वन विभागास कळविताच मा. वैशाली मंडल यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ वनविभागाचे वनपाल श्री. संग्राम जितकर, वनरक्षक इतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परस्थिती पाहून तातडीने जेसीबी मशीन आणून शेत विहीरीच्या एका बाजूने खोदकाम करून गवारेडा बाहेर पडण्यासाठी खोदून पायर्‍या वाट तयार करून विहिरीतून सुखरूप सुटका केली यानंतर नैसर्गिक आदिवासात रवाना झाला. खाद्य किंवा पाण्याच्या शोधात तो शेत विहिरीत पडला असावा अवघ्या काही तासात वनविभाग यांनी गवारेड्याची सुखरूप सुटका केल्याबद्दल वन्यजीव प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts