loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली हर्णे मार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात; एकाचा मृत्यू---

दापोली :- दापोली हर्णे मार्गावर सालदुरे येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी महेबुब बाबामिया नालबंद हा सकाळी 10.00 वा.चे सुमारास खेड वरुन हर्णे येथे बैलाचे पायाला नाल मारण्याकरिता त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र.एम.एच. 08 ए.एफ- 7067 दुचाकी गाडीवरून हर्णे येथे जात असताना कविजय लॉजिंग सालदुरे या ठिकाणी आला असता हर्णे ते दापोलीकडे जाणारे आयशर टेम्पो एम.एच. 08 ए.पी. 6188 हे समोरुन येत असताना दोघांच्यात जोरदार टक्कर होऊन अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सदर ट्रक हा शोएब महमंद शफी मुलानी, वय-27 वर्षे, रा.हर्णे ता. दापोली हा चालवीत होता. या अपघातमध्ये महेबुब बाबामियों नालबंद हा गंभीर जखमी झाल्याने त्यास तेथील ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने प्रथम आंबवली येथील प्राथमिक रुग्णालंय व त्यानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो मयत असलेचे घोषीत केले. या घटनेची नोंद उशिरापर्यंत दापोली पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts