loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी थोरले भरड चौकात गतिरोधक व चहूबाजूंनी आरसे बसवण्यासंदर्भात ग्रामस्था़चे निवेदन---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- साटेली भेडशी थोरलेभरड येथून चारही रस्त्यावर खडी वाहतूक करणारे डंपर, खाजगी वाहने, एस टी बस यांची रहदारी वाढली आहे. यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ याना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. चारही रस्ते अरुंद आहेत. झाडी वाढली आहे. कुठून वाहने येतात हे कळत नाही. तेव्हा चारही रस्त्यावर गतीरोधक बसवून येणारी वाहने दिसण्यासाठी आरसे बसवावे अशी मागणी येथील ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

थोरले भरड येथील खानयाळे, बोडदे, भेडशो खालचा बाजार व साटेली भेडशी वरचा बाजार येथून येणारे रस्ते चौकात एकत्र जुळतात. या ठिकाणी शाळकरी मुले व ग्रामस्थ बस थांव्याजवळ थांबत असतात. तरीही, चारही दिशेने वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व गतीरोधक (स्पीडब्रेकर नसल्यामुळे वारंवार अपघात होण्याची शक्यता असते. अगोदरही या ठिकाणी तीन चार अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साटेली भेडशी थोरलेभरड येथून शिरंगे, बोडदे, खोक्रल, खानयाळे, मा़ंगेली, साटेली भेडशी अशी शेकडो वाहने डंपर ये जा असते तेव्हा संभाव्य अपघात रोखण्यासाठी तसेच वाहनांची गती कमी करण्यासाठी गतीरोधक तसेच आरसे बसवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राजन उर्फ राजू गावडे, शुभम गवस, रॉफेल फर्नांडिस, मंथन देसाई, किशोर लोंढे, भरत गवस, मोतेश फर्नांडिस, सुरज गवस, विषांक घोगळे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts