loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्ती सोहळा उत्साहात---

कणकवली(प्रतिनिधी)- कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळ अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्ती सोहळा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून औदुंबर राणे मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. तसेच श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्ताने सकाळी 10 वाजता प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता सुस्वर भजने झाली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, कविता राणे, अभय राणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आदीनी भेट देऊन दर्शन घेतले. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीच्यावेळी औदुंबर राणे, शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत, माजी नगरसेवक अभय राणे, व्यंकटेश सावंत, ओंकार राणे, अब्दुल खान, ओंकार चव्हाण, रोहित जाधव, सौरभ साळुंखे, यश वर्दम, प्रवीण पाटील, संदेश आर्डेकर, संकेत फोंडेकर, शुभम कलिंगण आदी मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देणगी देणार्‍यांचे आभार यावेळी मानण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts