loader
Breaking News
Breaking News
Foto

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार, पत्रकार चंद्रकांत बनकर यांचे लाक्षणिक उपोषण

खेड (वार्ताहर) : भूमी अभिलेखच्या भोंगळ कारभार विरोधात पत्रकार चंद्रकांत बनकर हे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी उपअधिक्षक भूमी अभिलेख खेड कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, फेब्रुवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भूमी अभिलेख खेड कार्यालयात मोजणी प्रस्तावामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि साधे प्रस्ताव घेऊन मोजणी प्रकरणे निकालात काढण्यात आले आहेत. अनेक मोजणी प्रस्तावांवर व्हाईटनर लावून खाडाखोड देखील केली आहे तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनेक मोजणी प्रकरणे गहाळ केली आहेत. या कार्यालयातून गहाळ झालेल्या प्रकरण प्रकरणी समाधीत अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कायदेशीर कारवाईची परवानगी देखील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड यांनी केली. त्यानुसार त्यांना सबंधित अधिकार्‍यांवर कारवाईसाठी नोव्हेंबर २०२४ रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून परवानगी देखील देण्यात आली मात्र प्रत्यक्ष मोजणी प्रकरणे गहाळ करणार्‍या त्या अधिकार्‍यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनावणे यांनी उपोषण संदर्भात खेड तहसीलदार कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीला देखील भूमी अभिलेख खेड कार्यालयातील अधिकारी आणि एकही कर्मचारी उपस्थित राहिला नाही. गेल्या वर्षभरात हे कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले असून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी देखील अनेक वेळा या कार्यालयाची चौकशी देखील लावली आहे.

टाइम्स स्पेशल

गेल्या वर्षी २०२४ साली खेड भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमित मोजणी प्रकरणे, बेकायदेशीर मोजणी प्रकरणे आणि गहाळ मोजणी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी त्री-सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली होती, मात्र त्याच्या अहवालाच्या कारवाईचे पुढे काय झाले? याबाबत तक्रारदार यांना काहीही सांगण्यात आले नाही. आता खेड भूमी अभिलेख कार्यालयातील ५० हून अधिक गहाळ प्रकरणी सबंधित अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आणि त्याला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात पत्रकार चंद्रकांत बनकर हे २६ जानेवारी रोजी खेडच्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts