loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर स्थलांतरितांना गुन्हेगार म्हणत अमेरिका करतेय हकालपट्टी, स्वतंत्र विमानांची केली व्यवस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम सुरू केली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी अमेरिकन विमानांनी उड्डाणे सुरू केली आहे.जगातील स्थलांतरितांचा अमेरिकेत शोध घेतला जात असून त्यांची धरपकड करून मायदेशी पाठवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प म्हणाले की, हे सर्व धोकादायक गुन्हेगार आहे जे आपल्या देशात घुसले आहे आणि आम्ही त्यांना घालवून देत आहोत. अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी जगातील सर्वात मोठी मोहीम सुरू झाली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच, देशाने लष्करी विमानांचा वापर करून बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी हद्दपारीची उड्डाणे सुरू केली आहे.

टाइम्स स्पेशल

ट्रम्प यांनी पदाची शपथ घेताच बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर, एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे की भविष्यात, कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचे नागरिक मानले जाणार नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांना सांगितले की ट्रम्प यांच्या सीमा धोरणांमुळे आधीच 538 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts