loader
Breaking News
Breaking News
Foto

अज्ञाताने केला सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी. १२१३३ मुंबई - मंगलोर एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात साखळी खेचल्याने तब्बल सहा मिनिटे थांबली.

सावंतवाडी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ गोव्याकडे जाणारी मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढल्याने आज सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस किमान ६ मिनिटे थांबली. ही गाडीची साखळी ७.०१ मिनिटांनी अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ साखळी ओढण्यात आली आणि ७.७ मिनिटांनी ट्रेन या ठिकाणाहून रवाना करण्यात आली. त्यामुळे रेल्वे सहा मिनिटे थांबली. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असताना सकाळी अज्ञाताने प्रवासी संघटनेच्या आंदोलनास मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सावंतवाडीच्या नियोजित टर्मिनस वर थांबवण्यात आली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या रेल्वे रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला असताना सकाळी रेल्वेची साखळी ओढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनास प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, विलास जाधव, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सौ सुहानी गावडे, शांताराम गावडे, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सागर तळवडेकर,मोहन जाधव, सुधीर राऊळ, सुभाष शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भूषण बांदिवडेकर, संजय तानावडे, रवी जाधव, व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts