सावंतवाडी :रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षांसह पदाधिकारी जात असताना पोलिसांनी रोखले. दरम्यान प्रबंधक निदेशक यांच्याशी दि. २७ जानेवारी नंतर रेल्वे प्रवासी संघटनेची चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन रत्नागिरी यातायात प्रबंधक एस डी आबांर्डेकर यांनी दिले. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव,उमेश कोरगावकर, शांताराम गावडे, यांच्यासहित उपस्थितांनी रेल्वे टर्मिनस मंजूर झाले आहे तर ते केव्हा पूर्ण होणार ते सांगावं असं आग्रह धरत रेल्वे रूळावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रोखले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ गोव्याकडे जाणारी मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढल्याने आज सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस किमान ६ मिनिटे थांबली. ही गाडीची साखळी ७.०१ मिनिटांनी अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ साखळी ओढण्यात आली आणि ७.७ मिनिटांनी ट्रेन या ठिकाणाहून रवाना करण्यात आली. त्यामुळे रेल्वे सहा मिनिटे थांबली. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असताना सकाळी अज्ञाताने प्रवासी संघटनेच्या आंदोलनास मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सावंतवाडीच्या नियोजित टर्मिनस वर थांबवण्यात आली.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या रेल्वे रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला असताना सकाळी रेल्वेची साखळी ओढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनास प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, विलास जाधव, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सौ सुहानी गावडे, शांताराम गावडे, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सागर तळवडेकर,मोहन जाधव, सुधीर राऊळ, सुभाष शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भूषण बांदिवडेकर, संजय तानावडे, रवी जाधव, व मान्यवर उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.