loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनचे सदस्य आणि आवाशी (ता. खेड ) ग्रामपंचायतीच्या सदस्या श्रद्धा आंब्रे यांनी दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. सध्याची दिव्यांगांची असलेली पेन्शन दिव्यांगाना पुरेशी नाही ती दरमहा 1,500 रुपयांवरून 4,000 रुपये करावी आणि दिव्यांगांची पेन्शन दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत खात्यात जमा व्हावी, प्रत्येक आमदाराच्या दरवर्षीच्या आमदार निधीतून शासनाच्या जीआरप्रमाणे 5 टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करून दिव्यांगांना त्याचा लाभ द्यावा, दिव्यांगांना देण्यात येणार्‍या घरकुल निधीत 1,20,000 रुपयांवरून 2,50,000 रुपयांपर्यंत वाढ करावी, अशा मागण्या करण्यात आला. या मागण्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडू असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले. यावेळी अरुण कदम (अण्णा कदम), शशिकांत चव्हाण, श्रद्धा आंब्रे आणि आवाशी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts