loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल कर्जीच्या विद्यार्थाचे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नैत्रदिप यश

संगलट(इक्बाल जमादार) : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी व स्केटिंग अ‍ॅकॅडमी ऑफ खेड तालुका व रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत आपल्या कर्जी तालिमी अंजुमन कर्जी संचलित आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल कर्जीच्या कु.एहमद अजिम तांबे इ.1 ली या विद्यार्थाने 76 मिनिटे म्हणजे 1 तास 16 मिनिटे सलग स्केटिंग चालवून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून नेत्रदीपक यश मिळवत आपल्या कर्जी गावाचे नाव जागतिक पातळीवर गिनीस बुक ऑफ वर्ल्डमध्ये जाऊन ठेवले. दि.26 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातुन 30 खेळाडु व देश पातळीवरून 2 लाख खेळाडुंनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामध्ये आपल्या कु. एहमद तांबे याने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून देशात मजल मारली आहे आणि आपले नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. त्यांच्या यशाबद्दल आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल कर्जीचे शाळा समिती अध्यक्ष मुखतार परकार सर व आदर्श हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे शाळा समिती अध्यक्ष अखलाख परकार सर, मुख्याध्यापिका सौ.ललिता बैकर मॅडम यांनी केले. तर विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन क्रीडा शिक्षक अजय निगडेकर सर व ओम मोरे सर यांनी दिले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष हशमत परकार, सि. इ. ओ. आदम चौगले, सेक्रेटरी कमालुद्दीन तांबे सर्व संस्था सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांचे कर्जी पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts