loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी समाज युवक मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन

दापोली : कुणबी समाज विकास संघ (रजि.) संलग्न युवक मंडळ, महिलां मंडळ, वधू वर सूचक मंडळ. कुणबी समाज युवक मंडळाच्या वतीने भारताच्या प्रजासत्ताक दिन व ध्वजारोहण समारंभाचे औचित्य साधून रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 मुलुंड कुणबी समाज मंदिर केशव पाडा मुलुंड येथे कुणबी समाज युवक मंडळाच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं. कुणबी समाज विकास संघ (रजि) यांच्यावतीने सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावरण सोहळा मुलुंड कुणबी समाजाचे अध्यक्ष विनायक घाणेकर यांच्या हस्ते पार पडून या चित्रकला स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चित्रकला स्पर्धेमध्ये समाजातील इयत्ता जुनियर ते नववीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. ध्वजारोहण व चित्रकला स्पर्धा यानिमित्ताने वरिष्ठ मंडळाचे अध्यक्ष विनायक घाणेकर, सहसचिव सुनील मांजरेकर, अनंत कदम, शिवाजी तांबट, सुरेश लोखंडे, विजय आंबेकर राजाराम कोळंबे, सोनू उके, कृष्णा गोरिवले, रमेश कुलये, संजीवनी भुवड तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. करुणा गावडे, सेजल गोवले, रिटा पवार, समिता बाईत सौ, प्रमिला घाणेकर, संस्कृती जड्याळ, सोनाली जाधव, बेबी सकपाळ, वैभवी गोवले, आरती गोरीवले, सुनीता खेराडे. राजश्री खोपटकर संगीता पांढरे उपस्थित होत्या. भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन युवक मंडळाच्या वतीने युवा सहसचिव रुपेश तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्गदर्शक रवींद्र मांडवकर, महेंद्र उके, संजय गोवले, युवा उपाध्यक्ष प्रवीण शिबे, कृष्णा खोपटकर विकास गावडे, हर्षल रहाटे, प्रसाद बाईत शिवाजी मांडवकर या सर्वांचा सहकार्य लाभलं. तसेच या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून रवींद्र बडवे गुरुजी, शिवाजी तांबट, रिटा पोवार यांनी केले. शेवटी युवाध्यक्ष विनायक मांडवकर यांनी उपस्थित स्पर्धकांचे, ध्वजारोहण समारंभ निमित्ताने उपस्थित सर्व समाज बांधवांचे मान्यवरांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts