loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बाजारपेठेतील रस्त्यावर अपघात

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ठीक ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवर घसरून दर दिवशी दोन ते तीन अपघात होत आहेत. आज एक महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप होऊन सकाळी नऊच्या सुमारास अपघात घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळकरी मुलगी व तिच्या आईला हात, पाय व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यावेळेस सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी त्या दोघांनाही तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर पेशंटच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांचे आभार मानले. तसेच लक्ष्मण कदम म्हणाले की, बाजारपेठमध्ये रस्त्यावरील खडीवर घसरून दिवसातून दोन ते तीन अपघात घडत आहेत तसेच व्यापार्‍यांच्या दुकानातसुद्धा धुळीचे साम्राज्य वाढत चाललेले आहे. त्यामुळे व्यापारी सदर परिस्थितीला खूप हैराण झालेले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी ठिकठिकाणी बाजारपेठेतील रस्त्यावरील खडीवर घसरून दर दिवशी घडत असलेले अपघात थांबवण्यासाठी योग्य अशी कार्यवाही करावी.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts