loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणी तलाठी कार्यालयासंदर्भातील वायंगणी ग्रामस्थांचे जाहीर केलेले उपोषण स्थगित---

मालवण(प्रतिनिधी)- वायंगणी गावासाठी स्वतंत्र तलाठी, तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती व विद्युत पुरवठा या सुविधांसाठी येत्या दोन दिवसांत सरपंच, ग्रामस्थ व मंडळ अधिकारी यांची आपण एकत्रित बैठक घेऊन चर्चा करु व निर्णय घेवू त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण करु नये अशी विनंती मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टये यांनी केल्यानंतर रविवारी वायंगणी ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वायंगणी ग्रामस्थांनी रविवार दि. २६ जानेवारी रोजी तलाठी व तलाठी कार्यालय व इतर गोष्टींबाबत उपोषणाला बसणार असल्याची नोटीस मालवण तहसिलदार यांना देण्यात आली होती मात्र रविवारी सरपंच रुपेश पाटकर, माजी सरपंच हनुमंत प्रभू, ग्रामस्थ अमित खोत, रावजी सावंत यांनी तहसिलदार यांची भेट घेऊन चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाली असल्याने उपोषण स्थगित झाले असल्याचे सरपंच श्री. रुपेश पाटकर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts