loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबये बुरुमवाडी येथे माघी श्रीगणेश जयंती उत्सवाचे आयोजन

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील आंबये बुरुमवाडीतील श्री गणेश मंदिर येथे श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्यावतीने दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत माघी श्रीगणेश जयंती उत्सव उत्साहात पार पडणार आहे. शुक्रवारी ३१ रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण, सायं. ७ ते ८ - हरिपाठ, दिंडी व आरतीचा कार्यक्रम, रात्रौ ८ ते ९ - अन्नप्रसाद, रात्रौ ९ ते १२ - करंजाणी येथील नंद्कुमार कालेकर यांचे प्रवचन व कळंबणी महिला मंडळाचे भजन, रात्रौ १२ ते २- दिंडी कार्यक्रम. शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ - ’श्री’चा अभिषेक, दुपारी १२ ते १ श्री चा जन्मकाळ व आरती, दुपारी २ ते ३ - श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ ते ४ - महाप्रसाद, सायं. ४ ते ७ - श्री च्या पालखीचा भव्य मिरवणूक सोहळा, रात्रौ ८ ते ९ - अन्नप्रसाद, रात्रौ ९:३० - यशस्वी विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा, रात्रौ १०:३० - होम मिनिस्टर कार्यक्रम, रविवार २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती व दुपारी १२ ते १ - श्री भंडारा कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी व गणेश भक्तांनी उपस्थित राहून श्री गणेश दर्शनाचा, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन आंबये बुरुमवाडीतील श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या कार्यकारी मंडळ व सभासदांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts