loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तहसील कार्यालय आयोजीत क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

म्हसळा (वार्ताहर) : शासकीय व निमशासकीय अधिकारी तथा कर्मचारी वर्ग दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. या ताण तणावातून मुक्तता व उसंत मिळावी तसेच आरोग्य सुदृढ राहावे, या उदात्त हेतूने म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांचावतीने भव्य दिवस रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुसद्दीक इमानदार यांचा पटांगणात करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत तहसील कर्मचारी, महावितरण कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, व्यापारी संघटना, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला. म्हसळा पोलीस स्टेशनच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात महावितरण कर्मचार्‍यांचा पराभव करून चषक आपल्याकडे राखला. समालोचकाचे काम संतोष जाधव यांनी केले. कर्मचार्‍यांना कार्यालयीन कामकाजाबरोबरच विरंगुळा व प्रोत्साहन मिळावे तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखली जावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. असे प्रतिपादन तहसीलदार सचिन खाडे यांनी या सामन्याचा बक्षीस वितरण प्रसंगी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts