loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी एज्यू. सोसा. मालवण मुंबईचे मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ---

मालवण (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक श्री. वामन खोत यांना शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित विषयाच्या विविध उपक्रमासंबंधी व सिंधुदुर्ग जिल्हा गणित संघटनेमध्ये झोकून देऊन काम करताना विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टीकोन वाढावा यासाठी भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वामन खोत यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. श्री. खोत यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार जाहीर केळा होता. हा पूरस्कार ओरोस येथे जिल्हा गणित अधिवेशनात शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील गणित विज्ञान शिक्षक, गणित प्रज्ञा परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. श्री. खोत यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts