loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये ’स्केटिंग इंटरनॅशनल बूक ऑफ रेकाॅर्ड’ कार्यक्रम संपन्न . 1 तास 16 मिनीटे स्केटिंग करत 26 विद्यार्थ्यांनी रचला इतिहास.

खेड प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ खेड आणि खेड तालुका स्केटिंग ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ’स्केटिंग इंटरनॅशनल बूक ऑफ रेकाॅर्ड’ कार्यक्रम रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी 26 स्केटिंगपटूंनी तब्बल 1 तास 16 मिनीटे न थांबता स्केटिंग करत नवा वल्र्ड रेकाॅर्ड नोंदविला. सदरच्या स्केटिंग इंटरनॅशनल बूक ऑफ रेकाॅर्ड’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तद्नंतर उपस्थित मान्यवर व स्केटिंग प्रशिक्षक यांचे पुस्तकरूपी भेट देवून स्वागत करण्यात आले. याचबरोबर यापूर्वी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये आपले नाव कोरलेल्या स्केटिंगपटूंमध्ये कुमार श्री निगडेकर, कु. विश्व पाटणे व कु. ध्रुव भंडारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तद्नंतर सायंकाळी ठीक 4 वाजता स्केटिंग वर्ल्ड रेकाॅर्डची सुरूवात झाली. यामध्ये रोटरीच्या विद्यार्थ्यांबरोबर 26 विद्यार्थ्यांनी न थांबता सलग 1 तास 16 मिनीटे मोठ्या जिद्दीने व हिमतीने स्केटिंग करत नवा विक्रम नोंदविला. यामध्ये कु. मृणाल भोसले, कु. पूर्वा भोसले, कु. पायल मोहने, कु. श्वेता आर्या, कु. सीया टेलर, कु. सागर सुंदेशा, कु. आरव महाडिक, कु. ध्रुव भंडारी, कु. वरद टोंपे, कु. पूर्वेश चाळके, कु. स्वराज पवार, कु. ताहा कुडुपकर, कु. शार्विल शिंदे, कु. अवनिश गोगावले, कु. वीर मोरे, कु. अब्दुलरेहमान फोपलोनकर, कु. पारस खोपकर, कु. अहमद तांबे, कुमार श्री निगडेकर, कु. सोहम निगडेकर, कु. सानवी दरेकर, कु. अहाना बुटाला, कु. विश्व पाटणे, कु. निशांत जाधव, कु. अधिराज मांडवकर व कु. रुद्रनिल मोहिते या स्केटिंगपटूंचा समावेश आहे. या सर्व स्केटिंगपटूंच्या विक्रमाची स्केटिंग इंटरनॅशनल बूक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

वरील सर्व स्केटिंगपटूंनी मिळविलेल्या यशाबद्दल लवकरच त्यांचा भव्य सत्कारसोहळा आयोजित केला जाणार आहे. सदरच्या स्केटिंग इंटरनॅशनल बूक ऑफ रेकाॅर्डकरिता स्केटिंग कोच श्री. विजय निगडेकर व वूमन्स टीम कोच व चिपळूण तालुका स्केटिंग ॲकॅडमीच्या सेक्रेटरी सौ. योगिता पाटणे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी रोटरी क्लब ऑफ खेडचे मेंबर. संकेत बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, रोटरी शाळेचे उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पालक सौ. पूजा बुटाला, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. ओंकार काष्टे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts