loader
Breaking News
Breaking News
Foto

समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक

संमलिंगी संबंध ठेवणाऱ्या किंवा ठेऊ पाहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क वाढवून त्यांना निर्जळ स्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी ही कारवाई केली असून, भारत किसन धिंडले (वय 18, रा. सांगळे घाट, धायरी) याच्यासह या कामात मदत त्याला करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे येथील डिएसके रस्त्यावर काही तरुण वाहनांना हात दाखवून लिफ्ट मागतात तसेच आपल्याला तातडीने घरी जायचे आहे. वैद्यकीय आणिबाणी आहे, असे सांगून चालकाचे मन वळवतात आणि त्यांना निर्जळ स्थळी नेऊन लुटतात, असा एक संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्याची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत या टोळीचा पर्दाफाश झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्याशी गोड बोलून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात भेटण्यास बोलवतात. आरोपीही विश्वास ठेऊन कथीत जोडीदार (आरोपी) सांगतो त्या ठिकाणी जायला राजी होतात. हे प्रकरण अगदीच नाजूक असल्याने नेहमी निर्जळ ठिकाणच शोधले जाते. त्यासाठी आरोपी सुरुवातीला रहदारीच्या ठिकाणी एकटाच भेटायला येतो. त्यानंर पीडितास घेऊन निर्जन ठिकाणी जातो. याच वेळी त्याचे आणखी काही साथीदार तेथे येतात आणि मग सुरु होतो लुटमारीचा प्रसंग. पीडिताकडील सर्व रोख रक्कम, मोबाईल, मोबाईलमधील यूपीआयवरुन रक्कम लुटली जाते. त्यानंतर आरोपीला एकटे सोडून दिले जाते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात एका 32 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. या व्यवसायिकासोबत 14 जानेवारी रोजी सायंकाळी डीएसके विश्व शाळेजवर लुटमारीचा प्रसंग घडला. एका मुलाने तक्रारदाराशी 13 जानेवारी रोजी संपर्क साधला. या संपर्कातून दोघांमध्ये संवाद सुरु झाला. या संवादातून व्यवसायिकाने अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्यातून सदर व्यक्तीने बोलविलेल्या ठिकाणी म्हणजेच डीएसके विश्व येथे तो गेला. दरम्यान, सदर मुलाने या व्यवसायिकास त्याची दुचाकी तिथेच लावायला सांगितली आणि तो त्याला परिसरातील एका शाळेमागील निर्जळ स्थळी घेऊन गेला. तिथे गेल्यावर आरोपीचे आणखी दोन साथिदार तिथे आले आणि त्यांनी समलिंगी संबंध ठेवणे तर दुरच उलट त्याच्याकडील वस्तू, पैसे काढून घेतले. झालेल्या फसवणुकीमुळे हा तक्रारदार व्यवसायिक हताश झाला होता. मात्र, पोलिसांनी धीर दिल्याने त्याने तक्रार दिली. ज्यामुळे पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळता आल्या. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts