loader
Breaking News
Breaking News
Foto

माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बु ॥ येथे माजी विध्यार्थी मेळावा

वरवेली (गणेश किर्वे) : संगमेश्वर तालुक्यातील मौजे कुंभारखाणी बू ॥ ग्रामोत्कर्ष संघ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बु ॥ येथे प्रजासत्तक दिनाच्या औचित्याने माजी विध्यार्थी मेळावा संपन्न झाला. विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ केला. मेळाव्याचे प्रास्ताविक मुंबई संघांचे सरचिटणीस सदानंद शिवरामराव सुर्वे यांनी केले. संघाची स्थापना व वर्तमान ध्येय धोरणाबाबत विवेचन केले. विद्यालयातील मुलींनी बहारदार स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेळाव्यातील विशेष उपस्थिती माजी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, संघांचे पदाधिकारी एवं व्यासपीठावरील तमाम मान्यवरांना श्रीफळ, शाल आणि पुष्पगुछ देऊन सन्मानित केले. माजी विध्यार्थी प्रतिनिधी दत्ताराम अनंत चव्हाण (सन 1966/67) यांचा विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धेत प्रथम शमिका मेणे, द्वितीय अर्पिता बागवे, जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत अथर्व सुर्वे यांना पी. एन. जी. गाडगीळ शाखा चिपळूण यांचे सहकार्याने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील विजेती माजी विध्यार्थिनी तन्वी सुर्वे हिचा विद्यालयाकडून सत्कार केला. या आठवणीच्या मेळाव्यात इयत्ता दहावी सन 1980/81 चे विध्यार्थ्यांनीं प्रशालेस दोन संगणक संचाची सदिच्छा भेट दिली, त्याचे अध्यक्ष संतोषजी सुर्वे यांचे हस्ते अनावरण केले. मौजे कुंभारखाणी बु ॥ ग्रामोत्कर्ष संघाची स्थापना 1957 व प्रशालेची सुरुवात 1962 पासूनचे माजी विध्यार्थ्यानी प्रशालेचे पटांगण भरून गेले होते. माजी विध्यार्थी एकमेकांना सुमारे 40, 50, 60 वर्षांचे कालावधी नंतर भेटले होते, ज्यांना एकमेकांना नीटसे ओळखणे शक्य होत नव्हते.

टाईम्स स्पेशल

माजी विध्यार्थी संतोष चव्हाण (1978-78) गजानन सुर्वे (1977-78) गणेश अर्जुन सुर्वे, महेंद्र कदम (1980-81) हेमंत चव्हाण व आशिष सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशंसा केली. माजी विद्यार्थी व माजी शिक्षक विकास सुर्वे, सौं अनुजा नरेंद्र सुर्वे यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांसमोर ठेवली. ज्येष्ट माजी शिक्षक आदरणीय पवार सर आपल्या विशेष भाषा शैलीत उपस्थितांशी मुखातीब झाले. पवार सरांचे भाषणाने माजी विध्यार्थी गण गहिवरून गेले. काही जणांच्या तर डोळ्याच्या कडा ओलावल्या. कार्यक्रमा अखेर अध्यक्ष संतोषजी सुर्वे यांनी उपस्थिताना संबोधित केले. या कार्यक्रमाचे नियोजन आणि नियंत्रण प्रशालेचे मुख्याध्यापक जाधव सर, सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुवरे सर यांनी केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts