loader
Breaking News
Breaking News
Foto

शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी करून घ्या; तहसीलदार सचिन खाडे

म्हसळा (वार्ताहर) : शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणार्‍या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. मात्र, या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा, यासाठी आता ई केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे ई केवायसी पूर्ण झाले नसेल, तर लवकरच ते पूर्ण करा; अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याचा धोका आहे, असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा सूचनेनुसार म्हसळा तहसीलदार सचीन खाडे यांनी केले. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिका आणि आधार कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्वप्रथम रेशनधारकांनी रेशनकार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात जा. रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथला दुकानदार तुमचा अंगठा पॉस मशीनवर ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल. मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts