loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी तिकीट दरवाढीविरोधात मालवणात ठाकरे शिवसेना आक्रमक

मालवण (प्रतिनिधी) : एसटी तिकीट दरवाढ करणार्‍या महायुती सरकारचा निषेध असो... गोरगरीब जनतेची लूट करणार्‍या सरकारचा निषेध असो... अशा घोषणा देत आज मालवणात ठाकरे शिवसेनेच्यावतीने एसटी तिकीट दरवाढीच्या विरोधात मालवण एसटी आगारावर मोर्चा नेऊन एसटी आगारव्यवस्थापक महेश सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले. महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या जनतेला एसटी तिकीट दरवाढीमुळे अजून भरडण्याचे काम सरकारकडून होत असून दरवाढीमुळे महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मिळणार्‍या सवलती देखील कमी करण्यात आल्या आहेत, याचा आम्ही निषेध करतो, ही दरवाढ कमी न झाल्यास ठाकरे शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी तिकीट दरवाढी विरोधात आज ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण शिवसेना शाखा ते मालवण एसटी आगार असा मोर्चा काढण्यात आला. महायुती सरकारच्या निषेधाचे फलक झळकवीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, नितीन वाळके, महेश जावकर, यतीन खोत, किरण वाळके, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला तालुकाप्रमुख सौ. दीपा शिंदे, युवती सेना जिल्हा अधिकारी सौ. निनाक्षी मेतर, युवतीसेना मालवण कुडाळ प्रमुख सौ. शिल्पा खोत, नरेश हुले, किशोर गावकर, चंदू खोबरेकर, गणेश चव्हाण, चिंतामणी मयेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर, दिलीप परब, राहुल जाधव, मोहन मराळ, यशवंत गावकर, भायश्री खान, रुखिया शेख आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी हरी खोबरेकर यांनी परिवहन मंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन आगारव्यवस्थापक महेश सूर्यवंशी यांना सादर केले. दि. २५ जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १४.९५% एवढी भाडेवाड केलेली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून एस टी बसेच्या बर्‍याच सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवास तसेच एसटीच्या प्रवास वाहतूकसुद्धा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कमी करण्यात यावी. या दरवाढीमुळे महिला व जेष्ठ नागरिक यांच्या सवलती कमी करण्यात आल्या आहेत. महागाईमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या जनतेला या भाडेवाडीमुळे अजून भरडण्याच काम या महायुती सरकारकडून सुरु आहे. एकीकडे मोफत योजना व दुसरीकडे गाड्या वेळेवर न मिळणे, चालक- वाहक कमतरता यामुळे जनता त्रस्त असतानाच त्यात थेट १४.९५% एवढी प्रवासी भाडेवाढ मुळे सर्वसामान्य जनतेला होणार्‍या त्रासासाठी या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोध करत जाहीर निषेध करत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. एसटी तिकीट दरवाढ कमी न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी हरी खोबरेकर यांनी दिला. यावेळी आगारव्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांनी सदर मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येईल, असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts